नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६ सालच्या हुरुन इंडिया (Hurun India) 'सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय (Most Valuable Family Businesses)' आवृत्तीमध्ये अंबानी अव्वल तर पहिल्या पिढीतील उद्योजक कुटुंबांमध्ये अदानी आघाडीवर राहिले आहेत.
ठळक मुद्दे:
- हुरुन इंडियामार्फत 'बार्कलेज प्रायव्हेट बँक इंडियाच्या (Barclays Private Bank India)' भागीदारीसह '२०२६ बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्सची हुरुन इंडिया सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाच्या यादीची (Barclays Private Clients Hurun India Most Valuable Family Businesses List)' तिसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अंबानी ग्रुप सदर यादीनुसार, सलग तिसऱ्या वर्षी भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंब ठरले आहे.
- अंबानी ग्रुपने २५.८ लाख कोटी रुपये इतक्या एकूण संपत्तीसह अव्वल स्थान पटकाविले आहे.
- आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील बिर्ला कुटुंब ८.१४ लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर राहिले.
- तर सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जिंदाल कुटुंब ८.०२ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
इतर महत्वाच्या बाबी:
- बजाज समूहाचे संचालक नीरज बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कुटुंब ७.७० लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह चौथ्या स्थानावर कायम राहिले
- आनंद महिंद्रा (महिंद्रा अँड महिंद्रा) यांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कुटुंब ५.१५ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह पाचव्या स्थानावर राहिले.
- हिंदुस्तान झिंकचे नेतृत्व करणाऱ्या प्रिया अग्रवाल हेब्बार (व्यवसाय मूल्य ४.४५ लाख कोटी रुपये) या भारतातील सर्वात मौल्यवान महिला-नेतृत्व असलेल्या व्यवसायाच्या प्रमुख ठरल्या आहेत.
- त्यानंतर, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा या नाडर कुटुंबाचे (व्यवसाय मूल्य २.९१ लाख कोटी रुपये) नेतृत्व करत आहेत.
- पहिल्या पिढीतील व्यवसायांच्या श्रेणीमध्ये १९.६ लाख कोटी रुपये व्यवसाय मूल्यासह अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी कुटुंब आघाडीवर आहे.